पंतप्रधान मोदींनी जळगावातील लखपती दीदी परिषदेत 11 लाख महिलांना प्रमाणपत्रे प्रदान केली. महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकारच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला आणि मागील सरकारांवर टीका करताना म्हटले की, 70 वर्षांत जे काम झाले नाही ते आम्ही केले.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने 2024 च्या सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली, ज्यामध्ये भारत 82 व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टधारक 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता बांधणीला चालना देण्यासाठी तीन योजना एकाच छत्र योजनेत विलीन करण्यास मान्यता दिली आहे. 'विज्ञान धारा' ही योजना निधीच्या वापरामध्ये कार्यक्षमता वाढवेल आणि उप-योजनांमध्ये समन्वय स्थापित करेल.
भारत-अमेरिका यांच्यात पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांबाबत करार झाला. या कराराने भारताला AN/SSQ-53G अँटी-सबमरीन सोनोबॉय, AN/SSQ-62F अँटी-सबमरीन सोनोबॉय, AN/SSQ-36 सोनोबॉय मिळणारय. याने शत्रूंच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवणे,चोख प्रत्युत्तर देणे सोपे होणारय.
निवृत्ती जाहीर करणारे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची एकूण संपत्ती अंदाजे $17 दशलक्ष (INR 120 कोटी) आहे. त्याच्या उत्पन्नात BCCI करार, आयपीएल पगार, सामना शुल्क, जाहिराती, व्यवसाय उपक्रम आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.