एनडीए समर्थित सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या विजयाने एनडीएचे संसदेतील संख्याबळ पुन्हा सिद्ध झाले आहे.
नवी दिल्ली- एनडीए समर्थित सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. हा एनडीएचा मोठा विजय आहे. या विजयाने एनडीएचे संख्याबळ पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला आहे.
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ चे निकाल जाहीर झाले आहेत. एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली, तर INDIA आघाडीचे उमेदवार व माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली.
भारताला नवे उपराष्ट्रपती मिळाले असून ही जबाबदारी आता तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) सांभाळणार आहेत. भाजपकडून एनडीएचे उमेदवार म्हणून निवडले गेलेले राधाकृष्णन हे साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि दीर्घ राजकीय अनुभवासाठी ओळखले जातात.
जन्म आणि कुटुंब
सी. पी. राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूच्या तिरुप्पुर जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. त्यांचे वडील सी. के. पोन्नुसामी आणि आई के. जानकी आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आईने सार्वजनिकपणे आनंद व्यक्त केला होता. ते तामिळनाडूतील प्रभावशाली कोंगु वेल्लार गाउंडर समुदायाचे आहेत, ज्याचा राजकीय प्रभाव मोठा मानला जातो.
Vice President Election 2025 : उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो? इतर कोणत्या सेवा-सुविधा मिळतात?
पत्नी आणि मुले
२२ नोव्हेंबर १९८५ रोजी त्यांचा विवाह सुमती यांच्याशी झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे कुटुंब साधे, सुसंस्कृत आणि सादगीपूर्ण आयुष्य जगत आले आहे.
शिक्षण
राधाकृष्णन यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण व्ही. ओ. चिदंबरम कॉलेज, तूतीकोरिन येथे घेतले. त्यांनी बीबीए पदवी मिळवली. पुढे त्यांनी राजनीतिशास्त्रात संशोधन करून “सामंतवादाचा पतन” या विषयावर पीएचडी पूर्ण केली आणि डॉक्टरेट मिळवली.
खेळातील आवड
अभ्यासाबरोबरच त्यांना खेळांचीही आवड होती. कॉलेजच्या काळात ते टेबल टेनिस चॅम्पियन होते. क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि लांब पल्ल्याच्या धावण्यामध्येही त्यांनी भाग घेतला. तसेच ते योगाचे उत्तम जाणकार आहेत.
Vice President Election 2025 : राधाकृष्णन की रेड्डी, कोण जास्त शिकलेले? जाणून घ्या
राजकीय कारकीर्द
राधाकृष्णन यांनी भारतीय राजकारणात दीर्घकाळ योगदान दिले आहे. १९९८ आणि १९९९ मध्ये ते कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. पुढे त्यांना झारखंड, तेलंगणा, पुदुचेरी आणि महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली. सामाजिक कार्य, स्वच्छ प्रतिमा आणि तरुणांशी जोडलेले राहणे या गुणांमुळे ते लोकप्रिय नेते ठरले.
बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालचा झाला मृत्यू? अपघातामागील सत्य जाणून व्हाल हैराण
- जन्म: ४ एप्रिल १९५७, कोयंबतूर, तामिळनाडू
- पद: महाराष्ट्राचे राज्यपाल (२०२३ पासून)
- पूर्वीची पदे: खासदार (कोयंबटूर), भाजप तामिळनाडूचे अध्यक्ष
- विशेषता: स्वच्छ प्रतिमा, दक्षिण भारतात भाजपला बळकट करण्यातील योगदान
Nepal Gen Z Protest ! माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले, आंदोलकांनी पेटवले होते घर


