सोशल मीडियावर दोन पत्नींच्या प्रेमळ पतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येथे पत्नी मुस्लिम धर्माच्या असून पती हिंदू आहे.
डोक्यावरून घिरगावणाऱ्या ड्रोनला असामान्य वेगाने मगरीने तोंडात पकडले. मात्र, पहिल्याच चाव्यात ड्रोनमधील लिथियम आयन बॅटरीचा स्फोट झाला.
सुंदर महिलेसह बाइकस्वाराला अडवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने दंड न लावता सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, महिला सुंदर असल्यानेच दंड केला नसल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे लोक शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलतात. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. इतरांनाही करू दिले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष पुढील फेब्रुवारीच्या अखेरीस निवडला जाईल, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे.
ज्येष्ठ नागरिकाची तक्रार ऐकून न घेतल्याने आणि त्यांना एक तास वाट पाहण्यास भाग पाडल्याने नोएडा प्राधिकरणाचे सीईओ यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना २० मिनिटे उभे राहून काम करण्याची शिक्षा दिली.
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनने सांभळमधील अल्पसंख्याक बहुल भागात छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच बेकायदेशीर बांधकामाच्या आरोपाखाली नोटीस बजावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान यांच्या घरी मंगळवारी स्मार्ट मीटर बसवण्यात आले.
पॅलेस्टाईन नावाची बॅग घेऊन संसदेत आल्यामुळे वाद निर्माण झालेल्या वायनाडच्या खासदार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी संसदेत बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनासाठी लिहिलेली बॅग घेऊन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
गडकरींसह २० भाजप खासदार लोकसभेतील मतदानाला अनुपस्थित होते. हिवाळी अधिवेशनापूर्वी संयुक्त संसदीय समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे.