पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यावर देशभरातून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशभरातील अनेक नेत्यांनी लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.
Bharat Ratna to LK Advani : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कारासाठी अभिनंदन केले.
PM Narendra Modi : अबु धाबी येथे भारतीय समुदायातर्फे 'अहलान मोदी' नावाचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
आम आदमी पक्षाने भाजपवर आमच्या पक्षातील आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. यावरुनच आता दिल्ली पोलीस शनिवारी दुसऱ्यांदा नोटीस घेऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे.
LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' वर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत दररोज पूजा होणार आहे. या पूजेवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत स्थगित केली आहे.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्यावरुन अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाचव्यांदा समन्स पाठवला होता. ईडीच्या पाचव्या समन्सलाही केजरीवाल यांना धुडकावले आहे. ईडीच्या समन्ससंदर्भात आम आदमी पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसेदत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अशातच जाणून घेऊया कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे काय? या टॅक्सचा तुम्हाला काय होणार फायदा याबद्दल सविस्तर.....
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे कौतुक केले. नेमके काय म्हणाले वाचा सविस्तर...
UN Special Report : यूएन मानवाधिकार परिषदेकडून महिला आणि मुलींवरील अत्याचाराचा अहवाल तयार केला जात आहे. यामध्ये महिलांवरील अत्याचारास देहविक्री व्यवसायाशी जोडण्यात आले आहे.