लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्यापासून प्रचाराला मोठ्या प्रमाणावर रंगत निर्माण झाली आहे. लोकसभा जागा कोणत्या पक्षाला किती मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत किती जागा मिळणार याची जनतेला प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पतंजली उद्योगसमूहाच्या पुढच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना जाहिरातीद्वारे खोटे आणि दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दुपारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा किंवा सीएएच्या स्थगितीला नकार दिला आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षांच्या एकमेकांसोबत युती आणि आघाडी होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही दिल्लीत जाऊन पोहचले आहेत. ते महायुतीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध फंडे शोधून काढत असून मर्चन्डाईजचा त्यामध्ये भर पडली आहे.
बंगळुरूमधील मेघना फूड्स या कंपनीवर गोवा आणि कर्नाटक आयकर विभागाने धाड टाकली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातील एकूण जीडीपीमधील योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसरी यादी मंगळवारी (19 मार्च) जारी केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राज ठाकरे सहभागी होऊ शकतात अशा चर्चांना आता वेग आला आहे.