जून महिना सुरु व्हायला आलेला असताना उन्हाळ्यातील गरमी थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस उकाडा आणि उष्णता वाढतच चालला आहे. बुधवारी ३० मे रोजी दिल्ली आणि राजस्थानमधील अनेक भागात 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. त्यांनी येथे जाऊन ध्यान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
प्रज्वल रेवन्ना भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. बंगळूर विमानतळावरून SIT ने अटक केली असून त्याला न्य्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. त्याला १४ दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचार कार्यात सर्वात जास्त धावपळ केली. त्यांनी प्रचाराच्या वेळेला २०० रॅली आणि जाहीर सभा, ८० मीडिया मुलाखती दिल्या. प्रचाराच्या काळात व्यस्त असताना मीडियाला पंतप्रधानांनी मुलाखत देण्यास प्राधान्य दिले.
हसन येथील खासदार प्रज्वल रेवन्ना भारतात दाखल झाला असून त्याला बंगळूर येथील विमानतळावरच अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयापुढे हजर केले जाणार असून ते किती दिवसांची शिक्षा ठरवतात त्यानुसार पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.
जम्मू जिल्ह्यात यात्रेकरूंनी भरलेली बस सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. ही बस हरियाणातील कुरुक्षेत्र भागातून शिव खोरी भागात यात्रेकरूंना घेऊन जात होती. यात 15 जणांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाने यंदाचा मान्सून ३१ मे ते १ जून दरम्यान केरळात दाखल होईल, असं सांगितलं होतं.
Crime : मध्य प्रदेशातील जबलपुर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या वडिलांसह भावाची हत्या केल्यानंतर पळ काढला होता. यामागील कारण काय आणि नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....
भारत सरकारने गेमिंग, विशेषत: मुले आणि तरुण प्रौढांना प्रभावित करणारे ऑनलाइन गेमिंगचे व्यसन कमी करण्याच्या प्रयत्नात चीनमधील लोकांप्रमाणे वेळ आणि खर्च मर्यादा लागू करण्याची योजना आखली आहे.
शेअर मार्केटमध्ये ४ जूननंतर चांगले पैसे होतील, असा अंदाज इंटरनॅशनल ब्रोकरेज फर्मने सांगितला आहे. त्यानुसार मोदी शेअर्स या शेअर्सला नाव देण्यात आले असून त्या शेअर्सची संख्या ५४ आहे.