२०१५ पासून दिल्लीवर सत्ता गाजवल्यानंतर, AAP ला दशकभर चाललेल्या सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. दिल्ली दारू धोरण घोटाळ्यामुळे पक्षाच्या प्रामाणिक प्रतिमेचे मोठे नुकसान झाले.
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना ३१८२ मतांनी पराभूत केले.
दिल्ली दारू धोरण घोटाळा, मतदारसंघ बदलणे आणि तुरुंगवास ही मनीष सिसोदियांच्या पराभवाची प्रमुख कारणे ठरली. सिसोदिया यांना दारू धोरणातील भ्रष्टाचाराबद्दल अटक झाली होती, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २७ वर्षांनी सत्ता पुन्हा मिळवली आहे. मात्र, आपचे प्रमुख नेते मनिष सिसोदिया यांचा जंगपुरा मतदारसंघातून पराभव झाला आहे. सिसोदिया यांना ३४,०६० मतं मिळाली, तर भाजपाच्या तरविंदर सिंग मारवाह यांनी ६०६ मतांनी विजय मिळवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजयकडे वाटचाल करत आहे. काँग्रेससोबत युती न करणे, भ्रष्टाचाराचे आरोप, विकासाची वचनबद्धता, मोफत आश्वासनांची नुसती घोषणा आणि भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्णता ही आपच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे आहेत.
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल, परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत केजरीवाल १,४०० मतांनी मागे होते, तर वर्मा आघाडीवर होते.
मुलाचे लग्न साधेपणाने पार पडल्यानंतर, गौतम अदानी यांनी विविध सामाजिक कार्यांसाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन, संदीप दीक्षित, रमेश बिधूडी, मनीष सिसोदिया, अरविंदर सिंह लवली, प्रवेश शर्मा, आतिशी, सौरभ भारद्वाज आणि विजेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचे भवितव्य मतदारांच्या हातात आहे.
Delhi Election 2025 Result Live Updates: दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ची मतमोजणी 8 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी होणार आहे. दिल्लीच्या 70 विधानसभा जागांच्या मतमोजणीसाठी 11 जिल्ह्यांमध्ये 19 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या (ECI) मते, उत्तर-पश्चिम जिल्हे आणि नवी दिल्ली येथे प्रत्येकी तीन ठिकाणी, तर 4 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत म्हणजेच शनिवारी मतमोजणीचे स्पष्ट कल दिसून येतील, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान झाले होते.पाहिले तर सध्याच्या निवडणुकीत भाजप दिल्लीची खुर्ची मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर सत्ताधारी पक्ष 'आप'ला पुन्हा चौथ्यांदा सत्तेवर यायचे आहे. आता निकाल कोणाच्या बाजूने येणार? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. तुम्ही https://eci.gov.in/ किंवा https://results वर मतमोजणीचे निकाल देखील पाहू शकता.
अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता यांनी आयआयटी दिल्ली येथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये काम केले आणि आता त्या अन्न क्षेत्रात धमाल माजवत आहेत. हर्षिता केजरीवाल यांच्या करिअरची रंजक माहिती जाणून घ्या.
India