Lok Sabha Election 2024 : तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रराचावेळी गेल्या असता एक विधान केले आहे. या विधानाचीच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
West Bengal : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून ममता बॅनर्जींच्या सरकारवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आरोप लावलाय की, पोलिसांच्या अपयशामुळे दगडफेक झाली. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे. अशातच गोव्यातील साऊथ मधून उभ्या असलेल्या पल्लवी डेम्पो यांनी संपत्ती जाहीर केली आहे.
डिजिटल युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही लेव्हलला जाऊन काहीही करायला तयार आहेत. त्यामध्ये अगदी पोलीस दलातील लोकही मागे नसल्याचे दिसून येत आहे.
दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे तेथील समाज जीवनावर परिणाम झाला आहे. या ठिकाणी विमानतळे, मॉल आणि रस्त्यावर पाणी साचले आहे, येथील विमानतळावर पाणी साचल्यामुळे विमानांच्या उड्डाणाला उशीर होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लोकसभेच्या 102 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. देशात सात टप्प्यात निवडणुका होत आहेत.
पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सबाबत एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. येथे एक्स हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज दुपारच्या सुमारास रामनवमीच्या मुहूर्तावर 'सूर्य टिळक' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रामलल्ला मूर्तीच्या कपाळाला सूर्यप्रकाशाच्या किरणांनी अभिषेक करण्यात आल्याने एका अनोख्या घटनेचे साक्षीदार झाले.
भारतातील लोकप्रिय युट्युबर अभ्रदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला अँग्री रँटमॅन म्हणूनही देखील ओळखले जात होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याचे आज निधन झाले आहे.
इस्राइलची संरक्षण पद्धती मजबूत असून त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पद्धती जाणून घ्यायला हवी.