जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतातील कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की ते देशात "अविश्वसनीय काम" करत आहेत.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचे तापमान दिवसेंदिवस सर्वोच्च तापमान सीमेवर पोहचत आहे.
Patanjali Ads Case : बाबा रामदेव यांची संस्था पंतजली आयुर्वेदने सुप्रीम कोर्टात 23 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीआधी एक सार्वजनिक माफीनामा जाहीर केला होता. यावरूनच सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना बाळकृष्ण यांना फटकारले होते.
पक्षाच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराच्या वक्तव्यावर ताशेरे ओढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे, त्यांनी बीआर आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करत देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
तेलंगणातील पेड्डापल्ली येथे एका बांधकामाधीन पुलाचा काही भाग सोमवारी रात्री कोसळला. जोरदार वाऱ्याने पुलाचा काही भाग कोसळला. सुमारे 100 फूट अंतरावर असलेल्या दोन खांबांमधील पाचपैकी दोन काँक्रीट गर्डर रात्रीच्या वेळी कोसळले.
रायडिंग सेवा कंपनी ओलाने अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपली सेवा सुरू केली आहे. आता रामभक्तांच्या सेवेसाठी कार आली आहे.
जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर तेज असून त्या कायम आनंदी राहतात हे आपण पाहतो. त्या यासाठी काय करतात, हे जाणून घेऊयात.
सध्या अनेक जण इंटरनेटवर नोकरी अनेक जण नोकरी शोधताना दिसून येत आहेत. त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी आलेली दिसून येत आहे. भारतीय नौदलात नोकरीची संधी असून त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे.
मुकेश दलाल यांची खासदार म्हणून सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे.
विमान अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. सध्या मलेशियामध्ये नौदलाच्या कार्यासाठी सराव करताना लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. हेलिकॉप्टर कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी दोघेही एकत्र सराव करत होते.