लोकसभा निवडणुकीआधी ईडीकडून काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार आहे. खरंतर, ईडीकडून 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. दिल्ली जल बोर्डाचा हा घोटाळा असून यामधून आलेल्या पैशांमधून आम आदमी पक्षाला निधी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तेलंगणाच्या राज्यपालांनी राजीनामा दिला असून त्या लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सुश्री सुंदरराजन या पॉंडिचेरी येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या दाक्षिणात्य राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेलंगणा येथील सभेतून इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
निवडणूक रोख्यांबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. येत्या 21 मार्चच्या संध्याकाळपर्यंत बँकेने सर्व माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) द्यावी.
कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये भक्तीगीत वाजवल्याबद्दल सहा जणांना मारहाण करण्यात आली आहे. यावर कर्नाटक भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.
कोलकाता येथे बांधकामाधीन असलेली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 हून अधिक जणांचा बचाव करण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
सापाचे विष मनोरंजनासाठी, औषध म्हणून वापरण्याच्या प्रकरणात एल्विश यादव सह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्या प्रकणाच्या पुढील तपास पोलिस सध्या करत आहेत.
आंध्र प्रदेश येथे रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना लाइट टॉवरवर चढू नये असे आवाहन केले. टीडीपी सुप्रीमो एन चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याणसह पंतप्रधान मोदी एनडीएच्या रॅलीत सहभागी झाले होते.
पीएम सूर्य घर योजनेमुळे जनतेला मोफत सूर्याची वीज मिळणार आहे. या मोहिमेसाठी एक कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.