21व्या शतकातील 'पुष्पक' विमानाची यशस्वी चाचणी. इस्रोचे पुन: वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. यानंतर दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी म्हटले की, गरज भासल्यास केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस भूतान दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी त्यांचे स्वागत केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीच्या पथकाने अटक केले आहे. खरंतर, मद्य घोटाळ्यासंबंधित कारवाई करत ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतलेय.
भारतीय जनता पक्षाने याआधी दोन यादी जाहीर केल्या असून यातून काही प्रमाणात उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज भाजपाने तिसरी यादी जाहीर केली असून यात केवळ नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
आयपीएलच्या एक दिवस आधी चेन्नई संघाने मोठी घोषणा करत ऋतुराज गायकवाडला कर्णधार केले आहे. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात काँग्रेसची खदखद समोर आली आहे. अशातच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, कांग्रेसने भीतीपोटी भारतातील लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत.
केंद्र सरकारनं सोशल मीडियावरील कंटेटवर नजर ठेवण्यासाठी फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. पण आता सुप्रीम कोर्टानं त्यावर स्थगिती आणली आहे.
लोकसभा निवडणुकीआधी इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्हॉट्सअॅपवर विकासशील भारत मेसेज पाठवण्यासंदर्भात बंदी घातली आहे.