लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गर्लफ्रेंड सोबतचे सिक्रेट शेअर केले असून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ते रायबरेली आणि वायनाड या दोनही जागांवरून निवडून आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून ८ जून रोजी हा कार्यक्रम पार पडेल असे सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अनेक महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये स्मृती इराणी, नकुलनाथ यांचा पराभव झाला असून भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
बीड लोकसभेचे खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांची निवड झाली असून येथील मतदानाच्या फेऱ्या उशिरा पूर्ण झाल्या आहेत. येथे त्यांनी भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना हरवले असून हा त्यांच्यासाठी खूप मोठा विजय मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने २९२ एनडीए आघाडीने जिंकल्या असून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण असून इतर देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक सिनेस्टार निवडणुकीसाठी उभे होते. ते लोकसभेमध्ये निवडून आले असून आपल्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना आता दिसून येणार आहेत. यामध्ये कंगना राणावत, हेमामालिनी हे नाव आघाडीवर आहेत.
एनडीए आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला असे सांगण्यात आले आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आले असले तरी मित्रपक्षांच्या मदतीने ते सत्तास्थापनेचा दावा करतील
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असून उद्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे म्हटले आहे.
अयोध्येत भाजपचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असून भाजपच्या पराभवामागची कारणे समजून घ्यायला हवीत. तेच आपण या लेखातून समजून घेणार आहोत.