कुणाल कामरा, भारतीय स्टँडअप कॉमेडीत चांगलं स्थान मिळवणारा कलाकार आहे. त्याच्या विनोदी शैलीने अनेक वेळा वाद निर्माण केले. आता शिंदेवर केलेल्या टोमणामुळे तो पुन्हा चर्चेत आला.
कुणाल कामराने शिंदेंवर एका शोमध्ये टोमणा मारला. त्यावर शिंदे गटाने तीव्र प्रतिक्रिया दिली. शिवसेना कार्यकर्त्यांनी कुणालच्या स्टुडिओवर प्रदर्शन केलं. हॉटेलमध्ये तोडफोड केली.
कुणाल कामरा फक्त एक कॉमेडियनच नाही, तर तो एक सोशल मीडिया स्टार आहे. त्याचा यूट्यूब चॅनेल २.३१ मिलियन सब्सक्रायबर्ससह आहे.मजेदार शो, तिखट टिपण्ण्यांमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत असतो
कुणाल कामराची नेटवर्थ मीडिया रिपोर्ट्सनुसार सुमारे १ कोटी ते ६ कोटी आहे. त्याच्या यूट्यूब, शो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समधून त्याला आर्थिक फायदा होतो. शोसाठी १२ ते १५ लाख घेतो.
त्याने २०२० मध्ये अर्नब गोस्वामीवर केलेल्या टिप्पण्या त्याचवेळी झालेल्या फ्लाइटच्या वादामुळे त्यावर इंडिगो, गो एयर, स्पाइसजेटने ६ महिने प्रवासावर बंदी घातली होती.
कुणाल कामरा जेव्हा कुठे असतो, त्याचा प्रभाव राहतो. त्याच्या विनोदी शैलीत विचारांची गोडी, व्यंग्य असते. वादग्रस्त वचन, मजेदार टि्वट्स त्याला एक “विनोदी विद्रोही” म्हणून ठरवतात.