भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसागणिक वाढला जात आहे. अशातच काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले आहेत. मुफ्ती यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
संरक्षण मंत्रालयाने (MoD) सेनाप्रमुखांना प्रादेशिक सेनेतील प्रत्येक अधिकारी आणि नोंदणीकृत व्यक्तीला आवश्यक संरक्षण कर्तव्यांसाठी किंवा नियमित सैन्याला पाठिंबा देण्यासाठी तैनात करण्याचा अधिकार दिला आहे.
संरक्षण मंत्रालयाने माध्यमांना संरक्षण कारवायांचे थेट प्रक्षेपण टाळण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती उघड केल्याने कारवाया धोक्यात येऊ शकतात आणि जीव धोक्यात येऊ शकतात.
पाकिस्तानने 'ऑपरेशन सिंदूर'नंतर केलेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आहे, ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील नऊ दहशतवादी पायाभूत सुविधा लक्ष्य केल्या होत्या.
S-400: ऑपरेशन सिंदूरमध्ये S-400 सुदर्शन चक्राने शत्रूच्या हल्ल्यांना निष्प्रभ केले. पाकिस्तानची अनेक विमाने मारून खाली पाडण्यात आली. S-400 ची ताकद आणि भारताच्या सुरक्षेत ते कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ते जाणून घ्या.
वाढत्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाब सरकारने सर्व आयएएस आणि पीसीएस अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.
Indian Oil : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नागरिकांना भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या स्थितीत शांत राहण्यासह उगाचच पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.
पाकिस्तानने चिनी बनावटीच्या PL-15 क्षेपणास्त्राचा वापर करून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेले हल्ले मात्र अचूक ठरले, तर चीनची HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीही निष्प्रभ ठरली.
देशभरातील एटीएम २-३ दिवसांसाठी बंद राहतील असा खोटा दावा करणाऱ्या व्हायरल व्हाट्सअॅप मेसेजचा PIB ने खंडन केला आहे. PIB फॅक्ट चेकने मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे आणि एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहतील असे आश्वासन दिले आहे.
भारतीय रेल्वेने जम्मू आणि उधमपूरहून दिल्लीला अनेक विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. ट्रेन क्रमांक ०४६१२ जम्मूहून सकाळी १०:४५ वाजता सुटेल.
India