भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसागणिक वाढला जात आहे. अशातच काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले आहेत. मुफ्ती यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
India-Pakistan Tensions : भारताने पाकिस्तानातील दहशतवादाच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर लाँच केले. यानंतर पाकिस्तानची झोप उडाली असून भारताला प्रतिउत्तर देण्यासाठी आता हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला नेस्तनाबूत केले आहे. अशातच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या मेहबुबा मुफ्ती?
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, आता बस्स झाले, युद्ध थांबवा. याशिवाय भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत सीमावर्ती भागातील नागरिक खासकरुन महिला, मुलं बेघर होत आहेत. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना हा त्रास कितीवेळ सहन करतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला आहे. यामुळेच दोन्ही देशांनी संयम बाळगावा असे आवाहन मुफ्ती यांनी केले आहे.
22 एप्रिलला झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतावादाच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर लाँच केले. या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे चवथाळलेल्या पाकिस्तानने आता प्रतिउत्तर देण्यास सुरुवात करत भारताच्या दिशेने ड्रोन डागले. पण हे ड्रोनही भारताने नेस्तनाबूत केले.


