लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ज्यामुळे बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश येणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून ते सरकारवर समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा आरोप करत आहेत.
Vinesh Phogat announces retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला असून आता त्यावर राजकीय ते सर्वसामान्य स्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने जास्त आढळल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. तिच्या हृदयद्रावक अपात्रतेनंतर, विनेश फोगटचा पहिला फोटो समोर आला आहे.
बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ढाका येथील पंतप्रधानांचे निवासस्थान सोडून भारत किंवा लंडनला जाऊ शकतात. त्यांना त्यांचे भाषण रेकॉर्ड करायचे होते, पण त्यासाठी वेळ मिळाला नाही.