हिमाचल प्रदेश सरकार काँग्रेसची असल्याचे भाजप सदस्यांनी प्रियांका गांधींना आठवण करून दिली.
दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ईस्ट ऑफ कैलास डीपीएस, सलवान स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांना धमक्या मिळाल्या असून, शाळेच्या परिसरात स्फोटके असल्याचे सांगण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल रशियन भाषेत आला आहे. ही धमकी आरबीआय गव्हर्नरच्या मेल आयडीवर आली असून, याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ डिसेंबर रोजी कुर्ला पश्चिमेला झालेल्या नागरी वाहतूक उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले. या पार्श्वभूमीवर हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, आपने महिलांना दरमहा ₹१,००० देण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीत विजय मिळाल्यास ही रक्कम ₹२,१०० पर्यंत वाढवण्यात येईल. नोंदणी झाल्यानंतर, पैसे थेट खात्यात जमा केले जातील.