जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडा जिल्ह्यातील छत्रू परिसरात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये एन्काउंटर झाला. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर हा एन्काउंटर झाला.

Jammu Kashmir Terror Encounter : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडा जिल्ह्यातील छत्रू परिसरात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठा एन्काउंटर झाला. हा एन्काउंटर अशावेळी सुरू झाला ज्यावेळी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांसाठी सर्च ऑपरेशन सुरू केले. डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा परिसर असणाऱ्या या भागाला पूर्णपणे घेराव घालण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, कमीत कमी तीन दहशतवादी छत्रू परिसरात लपल्याचा संशय आहे. एन्काउंटर दोन्ही बाजूंनी जबरदस्त झाल्याचे वृत्त आहे.

दहशतवादी लपल्याची सूचना

सूत्रांनुसार, किश्तवाडा जिल्ह्यातील कांजल मांडू क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू केली. यावेळी त्यांनी ‘सर्च अँड डिस्ट्रॉय’ ऑपरेशन राबवले. मंगळवारच्या (2 जुलै) सकाळी 8 वाजल्यापासून हे ऑपरेशन सुरू असताना सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यानंतर फायरिंग थांबली.

Scroll to load tweet…

मे महिन्यात एक जवान शहीद

छत्रू परिसर आधी देखील दहशतवाद्यांचा गढ राहिला आहे. गेल्या वर्षात याच क्षेत्राक अनेक एन्काउंटर झालेत. अलीकडेच 22 मे रोजी दहशतवाद्यांच्या विरोधात चालवलेल्या ऑपरेशनमध्ये एक जवान शहीद झाला होता. या घटनेनंतर सुरक्षादलाकडून या परिसरावर करडी नजर ठेवली जात आहे.

परिसरात पुन्हा तणाव पण ऑपरेशन सुरूच

सैन्य आणि पोलिसांकडून दहशतवाद्यांना पकडण्यासह परिसर संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिकांना देखील सतर्क आणि मदतीचे आव्हान करण्यात आले आहे. सैन्याकडून लवकरात लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जात आहे. जेणेकरुन परिसरात शांतता पुन्हा येईल.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.