- Home
- India
- Online Shopping Rules 2027 : नव्या वर्षात बदलणार ऑनलाइन शॉपिंगचे नियम, सुरक्षित खरेदीसाठी 7 सोप्या टिप्स
Online Shopping Rules 2027 : नव्या वर्षात बदलणार ऑनलाइन शॉपिंगचे नियम, सुरक्षित खरेदीसाठी 7 सोप्या टिप्स
Online Shopping Rules 2027: ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणुकीपासून वाचण्यासाठी 2026 च्या नवीन ई-कॉमर्स नियमांनुसार 'Buy Now' बटणावर क्लिक करण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाने 7 महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासाव्यात.

ऑनलाइन शॉपिंग सुरक्षा व्यवस्था
2027 च्या जानेवारी महिन्यापासून नवीन ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) (सुधारणा) नियम, 2026 लागू होणार आहे. ज्याचे मुख्य उद्दिष्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अधिक पारदर्शकता आणणे हे आहे. किंमत, विक्रेत्याचे तपशील, सर्च रँकिंग, जाहिराती, 'डार्क पॅटर्न' (Dark patterns), ग्राहकांचा डेटा आणि तक्रार निवारणाच्या बाबतीत हे नियम मोठे बदल घडवून आणतील. मात्र, केवळ कायद्याने सायबर सुरक्षेचा धोका पूर्णपणे टाळता येणार नाही. विक्रेता पडताळून पाहिल्यानंतरही 'फिशिंग' लिंकद्वारे फसवणूक होऊ शकते. म्हणूनच, "Buy Now" बटण दाबण्यापूर्वी ग्राहकांनी खालील 7 गोष्टी तपासायला हव्यात.

विक्रेत्याची पडताळणी करा
विक्रेत्याच्या व्यवसायाचे तपशील, पत्ता, कस्टमर केअर माहिती आणि रेटिंग तपासा. फक्त फोटो आणि रिव्ह्यूवर विसंबून राहू नका, विशेषत: महागड्या वस्तू खरेदी करताना विक्रेता किती खरा आहे याची खात्री करा. पेमेंट पेज ठीक आहे का ते तपासा - कार्ड किंवा यूपीआय (UPI) माहिती देण्यापूर्वी वेबसाइटचा पत्ता चेक करा. ओळखीचे पेज नसून अचानक दुसऱ्या साइटवर गेल्यावर सावध राहा. तुमचा ओटीपी (OTP), पिन (PIN) किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. विनाकारण अधिक माहिती मागितल्यास पेमेंट रद्द करा.
पहिल्या सर्च रिझल्टवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका
नवीन नियमांनुसार सर्च रिझल्टमध्ये छेडछाड करता येणार नाही आणि रँकिंगची कारणेही सांगावी लागतील. तरीही, विक्रेता आणि वस्तूचे तपशील काळजीपूर्वक तपासा. साइटवरून बाहेर पडून इतरत्र पेमेंट करायला सांगितल्यास सावध राहा. पेड जाहिराती ओळखायला शिका: स्पॉन्सर्ड (Sponsored) यादी स्पष्टपणे दाखवली पाहिजे. ती आधी दिसत आहे म्हणजे ती विश्वसनीय आहे, असे नाही. अज्ञात लिंक किंवा फाईलवर क्लिक करणे टाळा.
डार्क पॅटर्न आणि दिशाभूल
अनावश्यक शुल्क किंवा दिशाभूल पसरवणाऱ्या 'डार्क पॅटर्न'च्या बाबतीत कंपन्यांना 2023 च्या नियमांचे पालन करावे लागेल. वर्षातून एकदा स्व-मूल्यांकन आणि संमतीपत्र देखील अनिवार्य आहे. अचानक येणारे पॉप-अप आणि वारंवार माहिती मागणारे मेसेज यापासून सावध राहा. डेटाचा वापर पहा: व्यवहारासाठी आवश्यक नसलेली वैयक्तिक माहिती देणे टाळा. 2026 च्या सुधारणेनुसार, काही डेटा वापरण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक साइटसाठी वेगळा आणि मजबूत पिन क्रमांक वापरा.
डिजिटल रेकॉर्ड ठेवा - पावत्या, ऑर्डर कन्फर्मेशन आणि चॅट मेसेज काळजीपूर्वक जतन करा. नियमानुसार 48 तासांच्या आत तक्रार स्वीकारून तिची प्रत देणे बंधनकारक आहे. 2025 मध्ये नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईनकडे आलेल्या 17,71,622 तक्रारींपैकी सुमारे 29 टक्के तक्रारी ई-कॉमर्सशी संबंधित होत्या.

