सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये पोहोचले आहेत. येथे पोहचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. 

झारखंड आणि बंगालचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (2 मार्च) रोजी बिहारमध्ये पोहोचले आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी 1:50 च्या सुमारास गया विमानतळावर पोहोचले, तिथे बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री नितीश हे 01.55 च्या सुमारास गया येथून हेलिकॉप्टरने औरंगाबादला रवाना झाले. पीएम मोदी 02:25 वाजता औरंगाबादला पोहोचले. यावेळी नितीश कुमार यांनी शाल पांघरून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले की, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही पुन्हा इकडे तिकडे जाणार नाही. हे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी हसायला लागले. याशिवाय आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नको आणि सर्व कामे एकत्रच करू, असेही ते म्हणाले. औरंगाबादेतील कार्यक्रम संपल्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेते हेलिकॉप्टरने बेगुसरायला रवाना होतील. या काळात मोदी बिहारला 1 लाख 72 हजार कोटी रुपयांची भेट देणार आहेत.

दीड वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार एकत्र स्टेज शेअर करणार आहेत. यापूर्वी बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचे युतीचे सरकार होते, ज्यातून नंतर नितीश कुमार यांनी वेगळे होऊन लालूंच्या राजद पक्षासोबत सरकार स्थापन केले. मात्र, नंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आणि राजदपासून दुरावले. बिहारचे नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीतही गेले.
आणखी वाचा - 
AmbaniPreWedding : 'अनंतकडे अनंत शक्ती, त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही', मुकेश अंबानी का म्हणाले घ्या जाणून
BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप उतरला मैदानात, बाबा बालकनाथ आणि ज्योती मिर्धा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांकडे सोपवली जबाबदारी
'बंगालची महिला शक्ती दुर्गा म्हणून उभी राहिली', संदेशखळीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीएमसी आणि ममता बॅनर्जींवर केली टीका