Job Offer : NLC इंडिया अंतर्गत 239 रिक्त पदांवर मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह महत्त्वाची माहिती

| Published : Mar 12 2024, 05:09 PM IST / Updated: Mar 12 2024, 05:10 PM IST

Government Job

सार

तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NLC इंडिया अंतर्गत 239 रिक्त पदांवर मेगा भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसंदर्भातील जाणून घ्या सविस्तर माहिती....

NLC India Recruitment 2024 :  नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडमध्ये रिक्त जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. या संदर्भातील परिपत्रक 11 मार्चला जारी करण्यात आले आहे. यानुसार, एनएलसीमध्ये 239 रिक्त जागांवर औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागाणार आहे. जाणून घेऊया यासंदर्भातील महत्त्वाची माहिती सविस्तर....

नोकर भरती पदाचे नाव

  • औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) - 100 रिक्त पदे
  • औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) - 139 रिक्त पदे

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 20/03/2024
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19/04/2024

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट

https://www.nlcindia.in/

वेतन

  • औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) पदांसाठी 18 हजार रुपये ते 22 हजार रुपये वेतन असणार आहे.
  • औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदासाठी तुम्हाला14 हजार रुपये ते 18 हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

  • एनएलसीमधील रिक्त पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता येथे क्लिक करा

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 41 दिवसांत 24 राज्यांचा गेला जलद दौरा, बंगालातही पोहोचले पंतप्रधान

CAA कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात, भारतीय नागरिकत्वासाठी वेबसाईला द्या भेट

ग्रीन हायड्रोजनच्या वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार