Nipah Virus in West Bengal Symptoms and Precautions : विषाणूची लागण झालेल्या टेरोपस वटवाघळांकडून किंवा डुकरांकडून माणसांमध्ये याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. बाधित व्यक्तींकडून इतर माणसांमध्येही हा आजार पसरू शकतो.
Nipah Virus in West Bengal Symptoms and Precautions : पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. एका आठवड्यात पाच जणांना निपाह विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. सोमवारी पहिल्या प्रकरणांची पुष्टी झाल्यापासून, सरकारी अधिकाऱ्यांनी सुमारे 100 लोकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला निपाहची लागण झालेल्या दोन परिचारिकांपैकी एकाची प्रकृती सुधारली आहे, तर दुसरीची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितले. दरम्यान, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेने या नमुन्यांच्या चाचण्या करुन निपाहची लागण झाल्याचे सांगितले आहे.
विषाणूची लागण झालेल्या टेरोपस वटवाघळांकडून किंवा डुकरांकडून माणसांमध्ये याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. बाधित व्यक्तींकडून इतर माणसांमध्येही हा आजार पसरू शकतो. आजारी व्यक्तींची काळजी घेणाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. विषाणूग्रस्त वटवाघळांच्या विष्ठेने दूषित झालेली पेये आणि वटवाघळांनी खाल्लेली फळे खाल्ल्यानेही हा आजार पसरू शकतो.
निपाह विषाणू हा प्राणी आणि माणसे यांच्यात पसरणारा एक विषाणू आहे. हा एक झुनोटिक आजार आहे, जो प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतो. तसेच, दूषित अन्नातून किंवा थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडेही तो पसरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बाधित लोकांमध्ये, हा विषाणू लक्षणे नसलेल्या (सबक्लिनिकल) संसर्गापासून ते तीव्र श्वसन आजार आणि प्राणघातक एन्सेफलायटीसपर्यंत अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो.
निपाह विषाणू: या गोष्टी लक्षात ठेवा
- वारंवार हात धुवा
- आजारी डुकरे किंवा वटवाघळांशी संपर्क टाळा.
- डुकरांचे फार्म स्वच्छ आणि निर्जंतुक करा
- खाण्यापूर्वी सर्व फळे धुवा आणि त्यांची साले काढा
- बाधित व्यक्तीची लाळ, रक्त किंवा इतर शारीरिक द्रवांशी संपर्क टाळा.
- वटवाघळांच्या वस्तीच्या ठिकाणी जाणे टाळा. वटवाघळांनी खाल्लेली फळे किंवा इतर वस्तूंना स्पर्श करू नका किंवा खाऊ नका.


