NEET (UG) 2026 Re-Exam : केंद्र सरकारडून आगामी नीट फेरपरीक्षेपूर्वी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तात्पूर्ती बंदी घातली आहे. याशिवाय टेलिग्रामवरील काही फीचरही बंद केले आहेत.
NEET (UG) 2026 Re-Exam : केंद्र सरकारने नीट फेरपरीक्षा 2026 पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तात्पूर्वी बंदी घातली आहे. येत्या 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी कायम असणार असून कोणालाही तो वापरता येणार नाहीये. यानंतर 30 जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याचे फीचरही बंद केले जाणार आहे. खरंतर परीक्षेपूर्वी पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये टेलिग्रामसारख्या अॅपच्या वापर केला जातो. यामुळेच केंद्र सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे.

टेलिग्राम वापरण्याची कारणे
पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असणारी लोक टेलिग्रामसारख्या अॅपचा वापर करतात. अथवा बनावट पेपरची विक्री केली जाते. याशिवाय टेलिग्रामवर गुप्तता आणि चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांच्या ग्रुपमुळे पेपर फुटीसारखी प्रकरणे घडली जातात. एवढेच नव्हे टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये कितीही सदस्य तुम्ही जोडू शकता, यासाठी कोणतीही मर्यादा नसते. जवळजवळ एका ग्रुपमध्ये 200 सदस्य सामील होऊ शकतात. मात्र ग्रुपच्या सदस्यांची मर्यादा उलटल्यास तो आपोआप सुपरग्रुपमध्ये बदलला जातो.
गुप्ततेमुळे घडतात पेपर फुटीची प्रकरणे
बहुतांश सायबर हल्लेखोर टेलिग्रामचा वापर तेथे अधिक गुप्तता असल्याने करतात. यामुळे टेलिग्रामवर सीक्रेट चॅनल्स तयार केले जाऊ शकतात. एकदा असे चॅनल्स तयार झाल्यानंतर याच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पोहोचवली जाते. खासकरुन अशा विद्यार्थ्यांपर्यंत जे परीक्षेची तयारी करत असतात. या चॅनल्समध्ये पालकांनाही सामील केले जाते.
काहीवेळेस पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना परीक्षेपूर्वीच प्रश्न पत्रिका मिळते. याचा गैरफायदा घेत प्रश्न पत्रिकेचे फोटो खासगी ग्रुप्समध्ये पाठवले जातात. यामुळे हेच फोटो हजारो लोकांपर्यंत सहज उपलब्ध होण्यासाठी मदत होते. याच महिन्यात उत्तर प्रदेशातून विशेष टास्क फोर्सकडून ऑनलाइन फसणूकीचे रॅकेट चालवणाऱ्या मास्टरमाइंडला अटक केली होता. हा व्यक्ती टेलिग्रामवरील चॅनल्सच्या मदतीने प्रश्न पत्रिका लीक करत होता.


