मुकेश अंबानी: जागतिक स्तरावरील टॉप २० प्रभावशाली उद्योजकांमध्ये
- FB
- TW
- Linkdin
भारत देशात अनेक उद्योजक आहेत. अंबानी, अदानी, टाटा, महिंद्रा, शिवनाडार असे अनेक बडे उद्योजक जागतिक स्तरावर ओळखले जातात. त्यापैकी एकाने अलीकडेच जगातील १०० सर्वात शक्तिशाली उद्योजकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ते रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आहेत. त्यांनी शक्तिशाली उद्योजक म्हणून देशालाच नव्हे तर जगालाही पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही माहिती फॉर्च्यून मॅगझिनने प्रसिद्ध केली आहे.
मुकेश अंबानी २०२४ सालच्या फॉर्च्यून मॅगझिनच्या प्रभावशाली उद्योजकांच्या यादीत समाविष्ट झालेले एकमेव भारतीय आहेत. या यादीत परदेशात स्थायिक झालेले सहा भारतीय वंशाचे लोकही आहेत. फॉर्च्यूनने अलीकडेच जगभरातील १०० सर्वात प्रभावशाली उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात मुकेश अंबानी यांनी १२ वे स्थान पटकावले आहे.
मुकेश अंबानी हे रिलायन्स समूहाचे मालक आहेत. तसेच ते देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजला उंच शिखरावर नेण्याद्वारे त्यांनी विशेष ओळख मिळवली आहे. जिओची सुरुवात करून त्यांनी देशातील दूरसंचार क्षेत्राचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. देशाच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे विकासाला वेग आला आहे. किरकोळ क्षेत्रात कंपनी नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. तसेच हरित ऊर्जा क्षेत्रातही कंपनी महत्त्वाकांक्षीपणे काम करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने पाऊल ठेवलेले नाही असे कोणतेही क्षेत्र नाही असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
८,४९,९२६ कोटी रुपयांच्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. १७,२७,००० कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज देशभरातच नव्हे तर इतर देशांमध्येही अनेक क्षेत्रात व्यवसाय करत आहे. म्हणूनच फॉर्च्यूनच्या प्रभावशाली उद्योजकांच्या २०२४ च्या यादीत मुकेश अंबानी यांनी अव्वल स्थानावर स्थान मिळवले आहे.
जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांच्या यादीत पहिल्या स्थानावर एलॉन मस्क आहेत. एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग दुसऱ्या स्थानावर आहेत. सत्या नाडेला तिसऱ्या स्थानावर, वॉरेन बफे चौथ्या स्थानावर आहेत. जेमी डिमॉन पाचव्या स्थानावर, टिम कुक सहाव्या स्थानावर आहेत. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग सातव्या स्थानावर, सॅम ऑल्टमन आठव्या स्थानावर आहेत. मेरी बारा, सुंदर पिचाई अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांच्या आधी ११ व्या स्थानावर Amazon चे संस्थापक जेफ बेझोस आहेत.