इंडिगोची एअर होस्टेस ऐश्वर्या सिंगची फ्लाईटमध्ये क्रिकेट लेजेंड एमएस धोनीसोबत भेट झाली. तिने धोनीला आपल्या कामाच्या ताणतणावाबद्दल सांगितलं. तेव्हा धोनीने तिला मोलाचा सल्ला दिला आणि एक जोक सांगून तिचं टेन्शन दूर केलं. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून त्याला १.८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मुंबई : कोणत्याही क्रिकेट फॅनसाठी फ्लाईटमध्ये एमएस धोनी भेटणं हे एखाद्या स्वप्नासारखंच असतं. पण इंडिगोची एअर होस्टेस ऐश्वर्या सिंगसाठी ही भेट आणखी खास ठरली, कारण या लेजेंडने तिला चक्क एक मोलाचा सल्ला दिला. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये ते दोघे अगदी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. ऐश्वर्याने धोनीला तिच्या कामाच्या धावपळीबद्दल सांगितलं. धोनीने तिचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं, तिला सल्ला दिला आणि एक जोकही सांगितला, ज्यामुळे ती हसू लागली. फ्लाईटमध्ये ड्युटीवर असताना तिने धोनीसोबत गप्पा मारल्याचं या व्हिडिओत दिसतंय. भारताच्या या माजी कर्णधाराला भेटल्याचा आनंद व्यक्त करताना तिने त्याला "द मिथ अँड द लेजेंड" (the myth and the legend) असं म्हटलंय.

या दिग्गज क्रिकेटरने तिचं बोलणं अजिबात टाळलं नाही. उलट, त्याने तिची अडचण समजून घेतली. त्यामुळे ही भेट एखाद्या सेलिब्रिटीसोबतच्या फॉर्मल भेटीसारखी न वाटता, एका मित्रासोबतच्या गप्पांसारखी वाटत होती. पण यानंतर जे घडलं, ते तिच्या कायम लक्षात राहणार आहे.

कामाच्या ताणतणावाला कसं सामोरं जायचं, यावर धोनीने तिला काही टिप्स दिल्या. मैदानावर आणि मैदानाबाहेर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या या माजी कर्णधाराने फ्लाईटशी संबंधित एक जोकही मारला. यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिचा तो थकवणारा आठवडा एका सुंदर आठवणीत बदलला.

ऐश्वर्यासाठी ही भेट भारताच्या सर्वात लोकप्रिय क्रिकेटरला भेटण्यापेक्षा खूप मोठी होती. तिने हा व्हिडिओ शेअर करताना या भेटीला "ड्रीम कम ट्रू" (dream come true) असं म्हटलंय. तसंच, धोनी हा "खऱ्या अर्थाने एक हिरा" (truly a gem of a person) असल्याचंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.

पाहा Viral व्हिडिओ

View post on Instagram
 

'कॅप्टन कूल'च्या या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर १.८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केलाय. अनेकांनी ऐश्वर्याला धोनीला भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी या सरप्राईज भेटीमुळे आपल्याला तिचा हेवा वाटत असल्याचंही कमेंट्समध्ये म्हटलंय.