झारखंडच्या रांचीमध्ये एक भन्नाट प्रकार घडलाय. ब्लॉक चौकातील एका दारूच्या दुकानात चक्क एक माकडीण शिरली. तिने बाटलीतून दारू प्यायली आणि तिथेच झोपून गेली. नंतर रेस्क्यू टीमला बोलावून या झोपलेल्या माकडिणीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
झारखंडच्या रांचीमध्ये एक अजब घटना घडली आहे. ओरमांझी भागातील ब्लॉक चौकात असलेल्या एका दारूच्या दुकानात अचानक एक माकडीण घुसली. दुकानात शिरल्यावर ती इकडे-तिकडे फिरू लागली.
गाढ झोपण्यापूर्वी या माकडिणीने दुकानात ठेवलेल्या एका बाटलीतून थोडी दारूही प्यायली. दारू प्यायल्यावर तिला चांगलीच झोप आली आणि ती दुकानातच एका कोपऱ्यात झोपून गेली.
दुकानात अचानक आलेल्या या पाहुणीमुळे दुकानदाराची चांगलीच तारांबळ उडाली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर रेस्क्यू टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी माकडिणीला सुखरूप बाहेर काढलं.
हा सगळा प्रकार पाहून लोकांनाही हसू आवरलं नाही. दारू पिऊन झोपण्यासाठी माकडिणीने दारूचं दुकानच निवडल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं.
या अजब घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. माकडिणीने अचानक दिलेली भेट आणि दुकानालाच आपला विश्रांतीचा अड्डा बनवल्याने हा विषय चर्चेचा ठरलाय.
माकड, दारूची बाटली आणि तिची झोप... या सगळ्या भन्नाट कॉम्बिनेशनमुळे सध्या रांचीमध्ये हाच विषय ट्रेंडिंगवर आहे.
