मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला वेगळा निर्णय, महायुतीसाठी करणार लोकसभेसाठी प्रचार

| Published : Apr 13 2024, 05:27 PM IST

Raj Thackeray meet Amit Shah

सार

मनसे नेते राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय होताना दिसून येणार आहेत. राज यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. 

मनसे नेते राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय होताना दिसून येणार आहेत. राज यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रचार करताना दिसणार आहेत. मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केले आहे. 

महायुतीचे कोणते उमेदवारात प्रचारात सक्रिय होणार? 
पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारात कोणते नेते सक्रिय होणार याची माहिती दिली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्या उमेदवार आणि नेत्यांनी संपर्क आणि समन्वय साधायचा, याबद्दलची आढावा बैठक घेतली आहे. यासंदर्भातील यादी पुढच्या दोन दिवसात जाहीर करू, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

नरेंद्र मोदी पुन्हा येणार निवडून - 
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात राम मंदिर बांधणार सांगितले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी देणे ही काळाची गरज आहे. तरुणांचे रोजगार, मराठी भाषेला अभिजात दर्जा असे अनेक विषय नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात होऊ शकतील असे राज ठाकरे यांनी दिली आहे. 

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंवर टीका - 
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे यांनी म्हटले की, “त्यांना कावीळ झालीय, त्यामुळे त्यांना सगळं तसं दिसतंय. दर निवडणुकीला अशी बुकिंग केली जाते. मी पक्षाचा म्हणून विचार करत असतो, त्यामुळे एक कार्यकर्ता, काय विचार करतो हे बघत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागायला सांगितलं आहे.” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये या निवडणुकीत जुगलबंदी दिसून येणार आहे. 
आणखी वाचा - 
अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढणार 'या' चिन्हावर, मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
बोर्नव्हिटा शरीरासाठी घातक? सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना बोर्नव्हिटाला हेल्थ ड्रिंक प्रकारातून काढण्याचे दिले आदेश