Mamata Banerjee Accuses BJP of Planning Pahalgam Style Attack : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक खळबळजनक प्रश्न विचारला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप पहलगामसारखा हल्ला घडवण्याची योजना आखत आहे का? 

Mamata Banerjee Accuses BJP of Planning Pahalgam Style Attack : 'निवडणुकांपूर्वी भाजप पहलगामसारखा एखादा हल्ला घडवण्याची योजना आखत आहे का?' असा खळबळजनक सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपनेही यावर जोरदार पलटवार केलाय. ममता बॅनर्जी 'हिंदूविरोधी' असून 'अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी' अशी विधानं करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ख्वाजा यांच्या वक्तव्यावर मोदी गप्प का?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या मुद्द्यावरून ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, 'पंतप्रधान मोदींनी कूचबिहारमध्ये प्रचारसभा घेतली, पण ख्वाजा यांच्या धमकीवर एक शब्दही बोलले नाहीत. मग काय, पहलगामसारखा दुसरा हल्ला घडवण्याचा प्लॅन आहे का? कुणी कोलकात्यावर हल्ला करण्याची भाषा करत असेल, तर एक भारतीय म्हणून आम्ही ते सहन करणार नाही. मग तुम्ही शांत कसे बसू शकता?' असं म्हणत ममता यांनी मोदींच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

'दीदी हिंदूविरोधी' - भाजपचा पलटवार

ममता बॅनर्जींच्या आरोपांवर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी تिखट प्रतिक्रिया दिली. 'केवळ व्होट बँकेसाठी, दीदी पहलगामच्या त्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला 'नियोजित' म्हणत आहेत, ज्यात अनेक हिंदू मारले गेले होते. त्या हिंदूविरोधी आहेत,' असा टोला भंडारी यांनी लगावला.

ख्वाजा आसिफ यांनी धमकी देताना म्हटलं होतं की, ‘पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना, भारत आमच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा बनाव रचू शकतो. जर असं काही झालं, तर आम्ही थेट कोलकात्याला लक्ष्य करू.’

Scroll to load tweet…