सार

मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत.केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.

मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत. केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. यामुळे व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आधीचे दर आणि आताच्या दरांमधील फरक :

आयओसीनुसार 1 मे पासून दिल्लीत 19 किलोचा इंडेन एलपीजी सिलेंडर 1764.50 रुपयांऐवजी 1745.50 रुपयांना मिळणार आहे. याच सिलिंडरची किंमत मार्चमध्ये 1795 ऐवढी होती. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडर हा 1879 रुपयांऐवजी 1759 रुपयांना मिळणार आहे. या ठिकाणी एलपीजीचे दर 20 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईत 1717.50 रुपयांऐवजी 1698.50 रुपयांना व्यावसायिक सिलेंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1930 रुपयांऐवजी 1911 रुपयांना मिळणार आहे.

एप्रिल महिन्यातच भाव झाले होते खूप कमी :

यापूर्वी, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल 2024 रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. या कपातीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. तर कोलकाता येथे व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी होऊन 1879 रुपये झाली आहे. मुंबईत सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपयांवर आली असून चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलिंडरच्या दरात पुन्हा कोणताही बदल नाही :

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. अशा परिस्थितीत त्याची किंमत कमी केल्यामुळे बाहेर खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. दुसरीकडे, यावेळी देखील घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आयओसीएलच्या वेबसाइटनुसार त्यांच्या किमती कायम आहेत. राजधानी दिल्लीत त्याची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे. पूर्वीप्रमाणेच कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध आहे. महिला दिनानिमित्त मोठा दिलासा देताना केंद्र सरकारने 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या (घरगुती एलपीजी सिलेंडर) किमतीत 100 रुपयांपर्यंत कपात करण्याची भेट दिली होती.