07:39 PM (IST) Apr 26
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्रिपुरात 77.53 टक्के तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 77.53 टक्के मतदानासह त्रिपुरा आघाडीवर होते तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी 52.74 टक्के मतदान झाले 

05:48 PM (IST) Apr 26
बीजेडी नेते व्हीके पांडियन यांची निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने केली कसून तपासणी

बीजेडी नेते व्हीके पांडियन नबरंगपूरमध्ये आले असता निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडने त्यांची कसून तपासणी केली. 

05:29 PM (IST) Apr 26
त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान

त्रिपुरामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 68.92 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रात सर्वात कमी 43.01 टक्के मतदान झाले. 

05:09 PM (IST) Apr 26
आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू, राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला विश्वास

आम्ही राजस्थानमधील लोकसभेच्या 25 जागा जिंकू असा विश्वास राजस्थानचे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी राज्यात काँग्रेसचे राज्य असताना त्यांनी लूट केल्याचा दावा केला आहे. 

04:45 PM (IST) Apr 26
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक कमी मतदान

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंतचे मतदान

  • आसाम 60.32 टक्के
  • बिहार 44.24 टक्के
  • छत्तीसगढ 63.92 टक्के
  • जम्मू-काश्मीर 57.76 टक्के
  • कर्नाटक 50.93 टक्के
  • मध्य प्रदेश 46.50 टक्के
  • महाराष्ट्र 43.01 टक्के
  • मणिपूर 68.48 टक्के
  • राजस्थान 50.27 टक्के
  • त्रिपुरा 68.92 टक्के
  • उत्तर प्रदेश 44.13 टक्के
  • पश्चिम बंगाल 60.60 टक्के

 

04:12 PM (IST) Apr 26
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी अरमोहा येथील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.

04:08 PM (IST) Apr 26
मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान

मध्य प्रदेशात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान झाले आहे. 

03:42 PM (IST) Apr 26
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी केले मतदान

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेमचंद बैरवा यांनी मतदान केले आहे. 

 

03:04 PM (IST) Apr 26
दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल- माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा

दुसऱ्या टप्प्यात भाजपा-जेडीएस 14 जागांवर विजय मिळवेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा यांनी व्यक्त केला आहे.

02:42 PM (IST) Apr 26
माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी केले मतदान

माजी क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ यांनी मैसूर येथे मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर जवागल श्रीनाथ यांनी म्हटले की, “घराबाहेर पडून मतदान करणे आपला हक्क आहे. यामुळे नागरिकांनी मतदान करावे. आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. मतदान करणे फार महत्त्वाचे आहे.”

02:09 PM (IST) Apr 26
महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.77 टक्के मतदान

आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशातच दुपारी 1 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पाहा-

  • आसाम 46.31 टक्के
  • बिहार 33.80 टक्के
  • छत्तीसगढ 53.09 टक्के
  • जम्मू-काश्मीर 42.88 टक्के
  • कर्नाटक 38.23 टक्के
  • केरळ 39.26 टक्के
  • मध्य प्रदेश 38.96 टक्के
  • महाराष्ट्र 31.77 टक्के
  • मणिपूर 54.26 टक्के
  • राजस्थान 40.39 टक्के
  • त्रिपुरा 54.47 टक्के
  • उत्तर प्रदेश 35.73 टक्के
  • पश्चिम बंगाल 47.29 टक्के
01:17 PM (IST) Apr 26
अभिनेता यश याने बंगळुरुत केले मतदान

अभिनेता यश याने बंगळुरुत मतदान केले आहे. 

12:56 PM (IST) Apr 26
काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी केले मतदान

माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते अनिल शास्री यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.

12:27 PM (IST) Apr 26
इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम येथे केले मतदान

तिरुवनंतपुरम येथे इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी लोकसभेसाठी मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर सोमनाथ यांनी म्हटले की, “मतदान केल्याने आनंद होतोय. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा.”

12:17 PM (IST) Apr 26
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मतदारांनी मतदानासाठी फिरवली पाठ

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील शिरकापूर येथील पहासू ब्लॉकमधील अकरवास गावातील लोक मतदारांनी मतदानासाठी पाठ फिरवली आहे. एसडीएम शिकारपूर प्रियंका गोयल यांनी म्हटले की, एकही चांगला रस्ता तयार करण्यात आलेला नाही आणि तो पाण्याने भरला गेलाय. यामुळेच आम्ही मतदान करणार नाही. पण याआधी अशा प्रकारची तक्रार आली नसल्याचे प्रियंका गोयल यांनी म्हटले आहे.

11:50 AM (IST) Apr 26
माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी केले मतदान

माजी कर्नाटक मुख्यमंत्री आणि जेडीएस उमेदवार एचडी कुमारस्वामी यांनी मतदान केले आहे. 

11:27 AM (IST) Apr 26
अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी केले मतदान

अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांसह रवी राणांनी मतदान केले आहे. 

11:13 AM (IST) Apr 26
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी गौतम बुद्ध नगर येथे केले मतदान

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे मतदान केले आहे. 

10:56 AM (IST) Apr 26
भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केले मतदान

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मतदान केले आहे. मतदान केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी म्हटले की, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी यावे. लोकशाहीच्या प्रक्रियेत योगदान द्या आणि मतदान करा. कारण मजबूत सरकार आणण्यासाठी तुमचे मत फार महत्त्वाचे आहे.

10:41 AM (IST) Apr 26
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले मतदान

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुंडी गावातील मतदान केंद्रावर मतदान केले आहे.

Read more Articles on