Kolkata Building Collapse : कोलकाता येथे बांधकामाधीन इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू

| Published : Mar 18 2024, 10:21 AM IST

Kolkata Building Collapse

सार

कोलकाता येथे बांधकामाधीन असलेली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 हून अधिक जणांचा बचाव करण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Kolkata Building Collapse : कोलकाता येथे रविवारी (17 मार्च) रात्री उशिरा एक बांधकामाधीन इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, गार्डन रीच (Garden Reach) परिसरातील हजारी मुल्ला बागान येथील पाच मजली इमारत मध्यरात्री कोसळली गेली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्यासाठी काहीजण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य आणि शोधकार्य सुरू आहे.

घटनास्थळावरुन आतापर्यंत 13 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) घटनास्थळी दाखल झाल्या असून तेथील स्थितीची त्यांनी पाहणी केली.

ममता बॅनर्जी यांचे ट्विट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर दुर्घटनेसंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय दुर्घटनेतील जखमी आणि जीव गमावलेल्यांच्या परिवाराला आर्थिक मदत केली जाणार असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

नक्की काय घडले?
घटनेबद्दल पोलिसांनी माहिती देत म्हटले की, गार्डन रीच परिसरात एक पाच मजली बांधकामाधीन इमारतीचा एक भाग बाजूला असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला गेला. याबद्दल पोलिसांना माहिती दिली असता त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन (SDRF) पथकही घटनास्थळी येत तातडीने बचावकार्य सुरू केले. अद्याप काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही स्थानिकांनी असा आरोप लावलाय की, इमारतीचे बांधकाम अवैध रुपात केले जात आहे. याशिवाय परिसरातील अन्य काही अवैध बांधकामाबद्दल स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

आणखी वाचा : 

Narendra Modi : आंध्र प्रदेश येथे नरेंद्र मोदींच्या सभेत लोक चढले होते लाईट टॉवरवर, मोदींनी खाली उतरण्याचे केले आवाहन

पीएम सूर्य घर योजना : एक कोटींहून अधिक लोकांनी केली नोंदणी, तुम्हीही करा लवकर अर्ज

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी या '4M' वर असणार निवडणूक आयोगाची करडी नजर, अशी करण्यात आलीय तयारी