Kolkata Hotel Fire : कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Kolkata Hotel Fire : कोलकाता येथील एका हॉटेलला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. कोलकातामधील बडा बाजार परिसरातील मछुआ फलमंडीजवळ असणाऱ्या रितुराज हॉटेलमध्ये मंगळवारी (29 एप्रिल) रात्री आग लागली. पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी घटनेची माहिती देत म्हटले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. सदर घटनेच्या अधिक तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. 

14 जणांचा मृत्यू

पोलिसांनुसार, मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजल्याच्या सुमारास हॉटेलला आग लागली. पोलिसांच्या पथकाकडून बचाव आणि मदत कार्यावेळी हॉटेलमधून 14 जणांचे मृतदेह बाहेर काढले गेले. रेस्क्यू टीमने काहीजणांना सुरक्षितरित्या हॉटेलमधून बाहेर काढले.

Scroll to load tweet…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट करत म्हटले की, "कोलकाता येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना.प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50 हजार रुपये दिले जातील."

Scroll to load tweet…

आग कशी लागली?

पोलीस सध्या या गोष्टीचा तपास करत आहेत की, हॉटेलमध्ये आग नक्की कोणत्या कारणास्तव लागली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली गेली. पण पूर्ण तपास झाल्यानंतर आगीचे योग्य कारण समोर येण्याची शक्यता आहे.

भाजपाकडून कारवाईची मागणी

हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेवर पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय जखमींना मदत करावी. याशिवाय अशाप्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये म्हणून फायर सेफ्टीच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे याबद्दलही मजूमदार यांनी म्हटले आहे.