हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ती प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेते वाय जी महेंद्रन यांनी या दोघांच्या लग्नाचे संकेत दिले आहेत.

हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन कायम चर्चेत राहत असते. आता ती लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ती संगीतकार अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील मालकीण दिव्याशी लग्न करणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता या दोघांचं लग्न होणार असल्याचे संकेत वाय जी महेंद्रन यांनी दिले आहेत.

महेंद्रन काय म्हणाले? 

महेंद्रन यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अनिरुद्ध हा खूप शांत आणि साधेपणाने वागणारा मुलगा आहे. मी यानिमित्ताने त्याचे अभिनंदन करू इच्छित आहे. मला जे सांगण्यात आलं, त्यानुसार त्यांच लग्न होणार आहे. नातेसंबंधामुळं दोघंही कायमच चर्चेत येत होते. अनिरुद्धच्या मामाने ते दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

काव्या आणि अनिरुद्ध यांच्यात किती आहे? 

अंतर काव्या आणि अनिरुद्ध यांच्यात २ वर्षाचं अंतर असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनिरुद्ध हा ३५ वर्षाचा असून काव्याचे वय ३३ आहे. रजनीकांत यांच्यापासून ते कमळ हसन, ज्युनिअर एनटीआर, थलपती विजय आणि शाहरुख खान यांच्या चित्रपटाला अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिलं होतं. तो रजनीकांत यांचा नातेवाईक आहे.