Ajit Pawar

Share this Video

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आभार मानले. मुंबईत पक्षाचा विस्तार, युवकांना जोडणे आणि काँग्रेसमधील इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार आणि वडील बाबा सिद्दीकी यांच्या विचारांवर काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला. इमरान खान प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास असल्याचे ते म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला नऊ महिने झाल्याचे सांगत या प्रकरणाची योग्य आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related Video