Intelligence test: माल पण घेतो अन् पैसेही? IAS मुलाखतीतील हे 5 चक्रावणारे प्रश्न
Intelligence test : यूपीएससी मुलाखतीत अवघड प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांद्वारे उमेदवाराची समज, तर्क आणि हजरजबाबीपणा तपासली जाते. जाणून घ्या IAS मुलाखतीतील असेच काही चक्रावून टाकणारे प्रश्न आणि त्यांची स्मार्ट उत्तरे.

असा कोणता दुकानदार आहे, जो तुमच्याकडून माल पण घेतो आणि पैसे पण?
बहुतेक लोक विचारात पडतात, पण याचे सरळ आणि हुशारीचे उत्तर आहे नाभिक. न्हावी तुमच्याकडून केस घेतो आणि त्याबदल्यात पैसेही घेतो. हा प्रश्न उमेदवाराची निरीक्षण शक्ती तपासण्यासाठी विचारला जातो.
अशी कोणती गोष्ट आहे, जी तारुण्यात हिरवी आणि म्हातारपणी लाल होते?
याचे योग्य उत्तर आहे मिरची. कच्ची मिरची हिरवी असते आणि पिकल्यावर किंवा सुकल्यावर लाल होते.
दोन घरांना आग लागली आहे, एक श्रीमंताचे आणि दुसरे गरिबाचे. पोलीस कोणत्या घराची आग आधी विझवितील?
योग्य आणि व्यावहारिक उत्तर हे आहे की, पोलीस आग विझवित नाहीत. आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाचे असते. हा प्रश्न उमेदवाराची व्यावहारिक समज तपासतो.
जगात असा कोणता देश आहे, जिथे एकही झाड नाही?
याचे उत्तर आहे कतार. हा प्रश्न सामान्य ज्ञानासोबतच वस्तुस्थितीवर आधारित जागरूकता तपासण्यासाठी विचारला जातो.
अशी कोणती वस्तू आहे, जी पाण्यात टाकताच गरम होते?
याचे योग्य उत्तर आहे, कळीचा चुना. पाण्याच्या संपर्कात येताच त्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि तो गरम होतो.

