स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहणानंतर ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. यावेळी पूर्ण गीत म्हटल्यावरून भाजपने सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याचा आरोप केला.

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘वंदे मातरम्’चे पूर्ण गायन करण्यात आले. मात्र, या गायनावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ पूर्ण होऊ न देण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावत कार्यक्रमादरम्यान कोणताही व्यत्यय आला नसल्याचे म्हटले आहे.

भाजपचा सोनिया गांधींवर गंभीर आरोप

भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी ट्विट करत सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना सोनिया गांधी यांनी कथितपणे नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांना मध्येच गीत थांबवण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सोनिया गांधींना ‘वंदे मातरम्’चा एवढा द्वेष का आहे, असा सवालही आर. पी. सिंह यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचा आरोपांना पलटवार

भाजपच्या या आरोपांवर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना कोणताही व्यत्यय आला नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून खोटे आरोप केले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ‘वंदे मातरम्’वरून कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’बाबत काँग्रेसचा ऐतिहासिक संदर्भ

जयराम रमेश यांनी यावेळी काँग्रेसचा ‘वंदे मातरम्’शी असलेला ऐतिहासिक संबंध स्पष्ट केला. त्यांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर १९३८ मध्ये काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली होती. या बैठकीला महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीत रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ गायन करण्याचा निर्णय घेण्यात आला. टागोर यांनी या गीतातील पहिला अंतरा गाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ गायले जात असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस नेत्यांकडून स्पष्टीकरण

काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना कोणताही व्यत्यय आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही ‘वंदे मातरम्’वरून कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, भाजप नेते अमित मालवीय यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘वंदे मातरम्’चा सुरुवातीचा अंतरा गायला गेल्यानंतर सोनिया गांधी यांनी गीत रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर हे करण्यात आल्याचा दावाही मालवीय यांनी केला आहे.