सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गुरुद्वारा येथे लंगर सेवा दिली असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गुरुद्वारा पटना साहिबला भेट दिली. त्यांनी येथे भेट दिल्यानंतर लंगर सेवेत सहभाग घेतला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भगव्या रंगाची पगडी घातल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिमंदिर जी येथील गुरुद्वाराला भेट देऊन लंगर सेवा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे एनडीए आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.
पाटणा येथील पाच महत्वाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण
पाटणा येथील पाच महत्वाच्या गुरुद्वारांपैकी एक गुरुद्वारा म्हणून याची ओळख आहे. तख्तचे बांधकाम 18 व्या शतकात महाराजा रणजित सिंग यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मस्थानाला चिन्हांकित करण्यासाठी केले होते. शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा जन्म १६६६ मध्ये पाटणा येथे झाला. आनंदपूर साहिबला जाण्यापूर्वी त्यांनी सुरुवातीची वर्षेही येथे घालवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली लंगर सेवा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे लंगर सेवा दिली आहे. मोदी यांनी सेवा दिल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारमधील पाटणा येथे गुरुद्वारामध्ये जाऊन येथे उपस्थित असणाऱ्या भाविकांना अन्नदान करण्याचे कार्य मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या दरम्यान गुरुद्वाराला भेट देऊन लंगर सेवा दिली आहे.
आणखी वाचा -
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात देशातील 'या' व्हीआयपी नेत्यांचे भवितव्य पणाला लागले, ओवेसींपासून ते अखिलेशपर्यंत यादी मोठी
वर्षभरात 2 कोटी नोकऱ्या, गरीबांना मोफत 200 यूनिट वीज; केजरीवाल यांच्या देशातील जनतेला 10 गॅरंटी