सार

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या मुलीने इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून दिली आहे. 

Pankaj Udhas :ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी आली आहे. आघाडीचे गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांची मुलगी नायब उधास यांनी मृत्यूची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, अत्यंत दुःखी अंतःकरणातून सांगत आहोत की पद्मश्री पंकज उधास यांचे सोमवार (26 फेब्रुवारी) रोजी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते.

 

View post on Instagram
 

 

पंकज उधास यांचा मृत्यू सकाळी ११ वाजता ब्रिज कॅण्डी हॉस्पिटल येथे झाला. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. गायकाचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर संपूर्ण मनोरंजन जगतात दुःख पसरले आहे. पंकज यांच्यासारख्या प्रतिथयश गायकाने जग सोडून जाणे हे दुःखद आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर या गायकाला श्रद्धांजली वाहत आहे.

आणखी वाचा -
Pankaj Udhas : "चांदी जैसा रंग है तेरा" गाणाऱ्या पंकज उधास यांना पहिल्या गायनासाठी बक्षीस म्हणून मिळाले होते 51 रुपये
Bangalore Metro : बंगळूर मेट्रो फक्त VIP लोकांसाठी आहे का? शेतकऱ्याचे घाणेरडे कपडे पाहून No Entry
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले उद्घाटन