भारत १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवर १५ ऑगस्टला सकाळी ६:३० वाजता DD National आणि DD News वर थेट प्रक्षेपण सुरू होईल.
मुंबई : भारत १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. परंपरेनुसार, ते तिरंगा फडकवतील आणि लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भाषण देतील.या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रांतील ५,००० विशेष पाहुणे, सामान्य नागरिक आणि तरुण असे मिळून सुमारे २७,००० लोक उपस्थित राहतील.
तुम्ही १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर जाऊ शकत नसाल, तर हा संपूर्ण सोहळा तुम्हाला टीव्ही आणि ऑनलाइन दोन्ही ठिकाणी पाहता येईल. जे लोक घरबसल्या हा कार्यक्रम पाहणार आहेत, त्यांच्यासाठी टीव्ही आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक मोफत पर्याय उपलब्ध आहेत.
टीव्हीवर कुठे बघाल? दूरदर्शनचं वेळापत्रक आणि चॅनल्स
स्वातंत्र्यदिनाचा सोहळा १५ ऑगस्ट रोजी दूरदर्शनच्या नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. दूरदर्शनने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सकाळी ६:३० वाजता थेट प्रक्षेपण सुरू होईल.प्रेक्षक DD National वर हा कार्यक्रम पाहू शकतील. तसेच DD News आणि दूरदर्शनच्या इतर प्लॅटफॉर्मवरही या राष्ट्रीय सोहळ्याचं कव्हरेज केलं जाईल. DD National आणि DD News हे प्रसार भारतीचे राष्ट्रीय चॅनल्स आहेत. तर DD Free Dish वर तुम्ही कोणत्याही मासिक शुल्काशिवाय हे चॅनल्स पाहू शकता.इतर टीव्ही चॅनल्सवरही पंतप्रधान मोदींचं भाषण LIVE दाखवलं जाईल.
ऑनलाइन कसं बघाल? दूरदर्शन YouTube, WAVES आणि HT INDIA
जे लोक ऑनलाइन पाहणार आहेत, त्यांच्यासाठीही अनेक पर्याय आहेत. दूरदर्शनच्या अधिकृत YouTube चॅनलवर २०२६ च्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा थेट प्रक्षेपित केला जाईल. WAVES हे प्रसार भारतीचं एक प्लॅटफॉर्म आहे, जे दूरदर्शन चॅनल्स दाखवतं. त्यावरही स्वातंत्र्यदिनासारखे राष्ट्रीय कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीम केले जातात.तुम्ही HT INDIA च्या YouTube चॅनलवरही हा कार्यक्रम पाहू शकता. तिथे १५ ऑगस्टला सकाळी ७ वाजता प्रक्षेपण सुरू होईल.हे सर्व प्लॅटफॉर्म्स हा कार्यक्रम मोफत लाईव्ह स्ट्रीम करतील. त्यामुळे तुम्ही टीव्हीवर किंवा वेबवर, घरबसल्या संपूर्ण कार्यक्रम पाहू शकता.


