जगातील सर्वात तरुण खेळाडू ; 17 व्या वर्षी ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ही कामगिरी करणारा दुसरा भारतीय...

| Published : Apr 22 2024, 02:00 PM IST / Updated: Apr 22 2024, 02:06 PM IST

d gukesh
जगातील सर्वात तरुण खेळाडू ; 17 व्या वर्षी ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ही कामगिरी करणारा दुसरा भारतीय...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने इतिहास रचला आहे.जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तर विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय ठरला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने इतिहास रचला आहे.जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तर विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय ठरला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकून त्याने जगज्जेत्या डिंग लिरेनला (चिनी ग्रँडमास्टर) आव्हान दिलं आहे. यावर्षीच्या अखेरीस डी. गुकेश आणि चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन यांच्यात सामना होणार आहे. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.

कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत गुकेशने अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा याच्याशी अंतिम सामना झाला. हा सामना अनिर्णित राखला आहे. गुकेशने स्पर्धेत 14 पैकी 9 गुण मिळवले होते. त्यामुळे सामना अनिर्णित ठरल्याने आणि गुण जास्त असल्यामुळे गुकेशला विषयी घोषित करण्यात आले.

विजयानंतर गुकेश म्हणाला की, 'खूप आनंद झाला. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोम्नियाच्ची यांचा सामना मी पहिला आणि त्याचा फायदा मला अंतिम सामन्यात झाला. तसेच एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच पण त्याचा विचार न करता सामन्याला सामोरे गेलो.

विश्वनाथ आनंद आणि पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा :

पाच वेळा जगज्येत्या विश्वनाथन आनंदने गुकेशसाठी एक्सवर पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या आहे. तसेच तुझा सार्थ अभिमान वाटतो असे देखील म्हंटले आहे. त्यांनतर पंतप्रधान मोदींनी देखील गुकेच्या या गमिरीबद्द्दल त्याची पाठ थोपटली आहे. शुभेच्छा देत म्हणाले की, गुकेशमुळे अनेकांना नक्की प्रेरणा मिळू शकेल.