अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मीयांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतात राहण्याची परवानगी. नवीन स्थलांतर कायदा लागू, नेपाळ आणि भुतानच्या नागरिकांसाठीही विशेष नियम.
केंद्रीय गृहमंत्रालयाने एक आदेश जारी केला असून त्यामुळे अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान येथून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या ३ देशांमधून (हिंदू, शीख, बुद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन) धार्मिक अल्पसंख्यांक ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी भारतात आले असतील तर त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयाचा आधार घेऊन Immigration and Foreigners Act, 2025 सोमवारपासून लागू करण्यात आला.
अल्पसंख्यांक नागरिकांना मिळाला आधार
Citizenship Amendment Act, 2019 (CAA) या कायद्याच्या धर्तीवर Immigration and Foreigners Act, 2025 लागू करण्यात आला. पण CAA च्या कायद्यानुसार जे नागरिक २०१४ पूर्वी आले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात येतं पण नवीन कायद्यामुळे डिसेंबर २०२४ पूर्वी आलेल्या सर्व नागरिकांना भारतात राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. धार्मिक अल्पसंख्यांक लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
नेपाळ आणि भुतानच्या नागरिकांसाठी कोणते नियम असणार?
या नवीन कायद्यामुळं फक्त भारतात राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. नागरिकत्व न देता भारतात आपण राहू शकता असं या कायद्याचं स्वरूप आहे. नेपाळ आणि भुतांच्या नागरिकांना येताना किंवा जाताना पासपोर्ट आणि व्हिसाची आवश्यकता लागणार नाही. या नव्या कायद्यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षितता मिळाली आहे. भारतीय नौदल, सैन्य, वायुसेना सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना पासपोर्ट किंवा व्हिसाची गरज लागणार नाही.
