सार

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सहा आमदारांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पाठानिया यांनी केली आहे. खरंतर राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Himachal Pradesh Politics Crisis : हिमाचल प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाच्या सहा आमदारांनी भाजप (BJP) पक्षाला मतदान केल्याने काँग्रेस आमदारांना अयोग्य घोषित करण्यात आले. या संदर्भात घोषण करत हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पिठानिया (Kuldeep Singh Pathania) यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या सहा आमदारांचे निलंबन केल्याची माहिती दिली आहे. राजिंदर राणा, सुधीर धर्मा, इंदर दत्त लखानपाल, देविंदर कुमार भुट्टू, रवि ठाकुर आणि चैतन्य शर्मा अशी निलंबन केलेल्या आमदारांची नावे आहेत.

याआधी हिमाचल प्रदेशातील राजकीय संकटादरम्यान, कुलदीप सिंह पिठानिया यांनी भाजपच्या 15 आमदारांचे निलंबन केले होते. याशिवाय बुधवारी (28 फेब्रुवारीला काँग्रेसचे सहा आमदार हरियाणात दाखल झाले होते, त्यांचे आज (29 फेब्रुवारी) निलंबन करण्यात आले आहे. खरंतर, काँग्रेसचे आमदार विधानसभेत दाखल झाल्यानंतर भाजपकडून त्यांचे टाळ्या वाजवत स्वागत करण्यात आले होते.

प्रियांका गांधी वाड्रा यांचा भाजपवर हल्लाबोल
भाजपने आधीच अंदाज लावला होता की, काँग्रेसच्या सहा आमदारांना सत्तारुढ पक्षावर विश्वास नाही. हिमाचल प्रदेशातील राजकीय संकटावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, 25 आमदार असणारा भाजप हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी खूप वेळ काम करतेय.

याशिवाय सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर भाजपवर हल्लाबोल करत म्हटले की, “लोकशाहीत जनतेला आपल्या पसंतीचे सरकार निवडण्याचा अधिकार आहे. हिमाचल प्रदेशातील जनतेने या अधिकाराचा वापर केला आणि बहुमताने काँग्रेसची सत्ता स्थापन केली. पण भाजप पैशाच्या बळाचा गैरवापर करून जनतेचा हा हक्क हिरावून घेऊ पाहात आहे.”

आणखी वाचा :

हिमाचल प्रदेशातील बंडखोर आमदार पोहोचले हरियाणात, विधानसभेच्या अध्यक्षांनी जारी केली कारणे दाखवा नोटीस

DMK Government : इस्रोच्या जाहिरातीत द्रमुकने केली मोठी चूक, कामाचे लाटले खोटे श्रेय

CBI : बेकायदेशीर खाण प्रकरणी सीबीआयने अखिलेश यादव यांना बजावले समन्स, 29 फेब्रुवारीला उपस्थित होण्याचे दिले आदेश