अहमदाबादमध्ये एक भयानक विमान अपघात झाला आहे. मेघानी नगर परिसरात सुमारे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. 

Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एक भयानक विमान अपघात झाला आहे. मेघानी नगर परिसरात सुमारे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान टेकऑफ दरम्यान कोसळले. सुमारे 242 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.हे विमान लंडनला जात होते आणि उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते कोसळले असे सांगण्यात येत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे विमान २ किमी अंतरावर कोसळले. अहवालात म्हटले आहे की विमान एका निवासी इमारतीवर कोसळले. विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जात होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून धुराचे काळे ढग आकाशात उठताना दिसत आहेत. वृत्तसंस्था एएनआयनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघनानगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत.मेघनानगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत.अपघातस्थळी बीएसएफ आणि एनडीआरएफच्या टीम रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त विमान बोईंग ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे, जे ११ वर्षे जुने होते.

Scroll to load tweet…

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांच्यासोबत दुर्घटनेबद्दल बातचीत केली आहे. यावेळी अमित शाह यांनी केंद्राकडून मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहेत.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

(आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत.)