काशी-मथुरा मंदिर प्रेमाने मिळाल्यास बाकी सर्व काही विसरुन जाऊ, गोविंद देव गिरी महाराजांचे मोठे विधान

| Published : Feb 05 2024, 01:00 PM IST / Updated: Feb 05 2024, 01:47 PM IST

govind dev giri maharaj

सार

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “काशी व मथुरा ही मंदिरे शांतपणे मुक्त झाल्यास आम्ही इतर मंदिरांबाबत आग्रह धरणार नाही.

Govind Dev Giri Maharaj Pune : श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी रविवार (4 फेब्रुवारी 2024) काशी आणि मथुरेबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, “काशी व मथुरा (श्रीकृष्णजन्मभूमी) ही मंदिरे मुक्त झाल्यास आम्ही इतर मंदिरांबाबत आग्रह धरणार नाही. कारण आम्हाला भूतकाळात नाही तर भविष्यात जगायचे आहे. देशाच्या प्रगतीसाठी भविष्याकडे बघणे महत्त्वाचे आहे.

ही तिन्ही मंदिरे (अयोध्या, ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी) शांतपणे आम्हाला परत मिळाली तर आम्ही म्हणजेच हिंदू समाज बाकीच्या सगळ्या गोष्टी, इतर मंदिरांबाबतचे विवाद विसरून त्याबाबतीतला आग्रह सोडून देऊ.

परिस्थितीनुसार निर्णय घेऊ - गोविंद देव गिरी महाराज

रविवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान गोविंद देव गिरी महाराज (Govind Dev Giri Maharaj)यांना विचारण्यात आले की, उर्वरित मशिदी देखील मंदिरांवर बांधल्या आहेत का? तेव्हा ते म्हणाले की, “असे काही सांगता येणार नाही. मी त्या लोकांनाही प्रेमाने समजावून सांगेन. पण काही ठिकाणी समजूतदार लोक आहेत, तर काही ठिकाणी समजूतदार लोक नाहीत. जिथे जशी परिस्थिती असेल, त्यानुसार आम्ही काम करू. आम्हाला कोणत्याही प्रकारची अशांतता व अस्थिरता नको आहे.”

मुस्लिम समुदायाला केले आवाहन

गोविंद देव गिरी (Govind Dev Giri Maharaj) ज्ञानवापी बद्दल बोलताना म्हणाले की, “मी मुस्लिम समुदायाला हात जोडून आवाहन करतो की, अयोध्या, ज्ञानवापी(Gyanvapi) आणि कृष्णजन्मभूमी (Mathura) ही तीन स्थाने हिंदूंच्या ताब्यात द्यावी. आमची ही पवित्र तीर्थस्थाने आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केली. बाहेरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी आमची साडेतीन हजारांपेक्षाही जास्त मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत.हे आपल्यावरचे सर्वात मोठे डाग आहेत. यामुळे लोकांचे हाल होत आहेत.

आम्ही केवळ आमची तीन तीर्थस्थाने परत मागतो आहोत. सामोपचाराने हा विवाद संपला तर देशात बंधुभाव वाढण्यास मदत होईल. आता भव्य राम मंदिर बांधले गेले आहे आणि 22 जानेवारीला रामलला त्यांच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे शांततेत व सामोपचाराने आम्हाला परत मिळाली आम्ही इतर सर्व मंदिरांशी संबंधित प्रश्न बाजूला ठेवू.”

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी एका कार्यक्रमासाठी पुण्यातील आळंदीत उपस्थित होते. तिथे त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.

आणखी वाचा -

Maulana Salman Azhari Arrested : गुजरातमध्ये द्वेषपूर्ण भाषण केल्याने मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक, समर्थकांनी घातला गदारोळ

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले हे विधान, म्हणाले...

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया