सार

प्रज्वल रेवन्ना यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या खासदारांचा चालक अचानक गायब झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच एसआयटी त्या चालकाचा शोध घेत असल्याचे देखील सांगितले जात आहे..

अनेक महिलांचं शोषण केल्यानं आणि याचे हजारो व्हिडिओ लीक झाल्यानं प्रज्वल रेवन्ना हे नाव सध्या देशभरात चर्चेत आलं आहे. प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवैगौडा यांचे नातू असून सध्या जेडीएसचे खासदार आहेत. पण यंदा रेवन्ना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात असून प्रधानमंत्री मोदींनी स्वतः यांचा प्रचार केला होता. त्यामुळं आता भाजप आणि मोदी देखील अडचणीत आले आहेत. यापार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर येत आहे.प्रज्वल रेवन्ना यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या खासदारांचा चालक अचानक गायब झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच एसआयटी त्या चालकाचा शोध घेत असल्याचे देखील सांगितले जात आहे..

चालक १३ वर्षांपासून प्रज्वल रेवन्ना सोबत :

माजी पंतप्रधान एचडी देवैगौडा यांचे नातू असून सध्या जेडीएसचे खासदार असलेले प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी चालक म्हणून १३ वर्षे कार्थिकने काम केले आहे. एका वर्षापूर्वी जमिनीच्या कथित व्यवहारावरून तो बाहेर पडला होता.

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा आरोप :

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ड्रायव्हरच्या बेपत्ता होण्यामागे काही प्रभावशाली नेते असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा उल्लेख करत कार्तिकला मलेशियाला कोणी पाठवले असा सवाल उपस्थित केला आहे.

उर्वरित वृत्त थोड्याच वेळात अपडेट करत आहोत….