फ्लिपकार्टने डिजिटल मीडिया कंपनी पिंकविलामध्ये बहुमत हिस्सेदारी विकत घेतली आहे. या अधिग्रहणानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट पिंकविलाच्या मोठ्या प्रेक्षकवर्गाचा फायदा घेऊन जेन जी आणि मिलेनिअल ग्राहकांशी असलेला संबंध वाढवेल.
Flipkart-Pinkvilla Deal: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने डिजिटल इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्म पिंकविला इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बहुमत हिस्सा मिळवला आहे. हे अधिग्रहण पिंकविलाच्या स्थापित ब्रँड, क्षमता आणि निष्ठावंत प्रेक्षकवर्गाचा फायदा घेऊन आपल्या कंटेंटचा विस्तार करण्याच्या आणि जेन-जीशी संबंध वाढवण्याच्या फ्लिपकार्टच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे. फ्लिपकार्टने केलेले हे अधिग्रहण कंपनीला ट्रेंडची माहिती मिळवण्यासाठी आणि कॉमर्स संधींसाठी कंटेंट तयार करण्याची संधी देते, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीची स्थिती आणखी मजबूत होईल.
जेन झेडशी आमचा संबंध वाढवेल ही डील
फ्लिपकार्टचे कॉर्पोरेट सीनियर व्हाइस प्रेसिडेंट रवी अय्यर यांच्या मते, पिंकविलामध्ये बहुमत हिस्सा मिळवणे हे जेनरेशन झेडशी आमचा संबंध दृढ करण्याच्या आमच्या ध्येयातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. २००७ मध्ये सुरू झालेले पिंकविला चित्रपट, मनोरंजन आणि सेलिब्रिटींशी संबंधित बातम्यांसाठी लोकप्रिय आहे. या श्रेणी भारतीय ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी आणि ट्रेंडवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टने हे पाऊल मिलेनिअल ग्राहकांशी जास्तीत जास्त जोडण्यासाठी उचलले आहे.
पिंकविलाच्या सीईओ नंदिनी शेनॉय यांनी डीलवर काय म्हटले?
पिंकविलाच्या संस्थापक आणि सीईओ नंदिनी शेनॉय म्हणाल्या, "फ्लिपकार्टने केलेली गुंतवणूक आमच्याद्वारे तयार केलेल्या मजबूत प्लॅटफॉर्म आणि कंटेंटचा पुरावा आहे. आम्हाला विश्वास आहे की फ्लिपकार्टच्या सहकार्याने आम्ही आमचे ऑपरेशन्स वाढवू शकू आणि प्रेक्षकांना उच्च दर्जाचा कंटेंट देऊ शकू, जो आमच्या कोट्यवधी युजर्समध्ये दिसून येईल. या डीलनंतर इन्फोटेनमेंट सेक्टरमधील आमची स्थिती आणखी मजबूत होईल." ही डील अंतिम झाली आहे. दोव्ही कंपन्यांना आशा आहे की हा व्यवहार लवकरच पूर्ण होईल.
फ्लिपकार्टचे संस्थापक कोण आहेत?
फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसल आहेत. दोघांनी मिळून २००७ मध्ये या कंपनीची सुरुवात केली होती. सुरुवातीला ही कंपनी ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून सुरू झाली होती, परंतु हळूहळू त्याचा विस्तार झाला आणि आता ती भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे.


