सार
दौलत बेग ओल्डी येथील भारतीय लष्कराचा तळ चीनच्या सीमेपासून अवघ्या 25 किमी अंतरावर आहे. या भागात पर्वत, नद्या आणि तलाव आहेत.
लडाख : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने लष्कराचे पाच जवान बुडाले. भारतीय लष्कराच्या जवानांचा हा अपघात चीनच्या सीमेजवळ नियंत्रण रेषेजवळ घडला. दौलत बेग हे ओल्डी काराकोरम रेंजमध्ये वसलेले आहे, या ठिकाणी लष्कराचा तळ आहे.
लडाखमधील एलएसीजवळ अचानक आलेल्या पुरात लष्कराचे पाच जवान बुडाले. आर्मी टँक नदीचा खोल भाग ओलांडत असताना तिथे अडकला. यावेळी पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ते पाण्याने भरले, त्यामुळे लष्कराचे जवान बुडाले. सध्या शोधमोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, अपघातावेळी रणगाड्यात लष्कराचे पाच जवान होते. यामध्ये एक जेसीओ आणि चार सैनिकांचा समावेश आहे. एक जवान सापडला आहे, तर उर्वरित चार जवानांचा शोध सुरू आहे. दौलत बेग ओल्डी येथे ज्या रणगाड्याला अपघात झाला तो भारतीय लष्कराचा T-72 टँक होता. भारताकडे 2400 T-72 रणगाडे आहेत. भारतीय लष्कर अनेक वर्षापासून या रणगाड्यांचा वापर करत आहे.
आणखी वाचा :
Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघातात चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू