उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटल्याने ते रद्द करण्यात आले आहेत. या पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठातीलच एक शिक्षक आरोपी असून, त्याच्यावर सात वर्षांसाठी परीक्षेच्या कामातून बंदी घालण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे. देशभरात पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असताना ही घटना घडली आहे.

दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. येथे विद्यार्थी देशभरातून येत असल्याचं दिसून येत आहे. आता दोन पेपर फुटले आहेत. उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठातील अभियांत्रिकीचे दोन पेपर फुटले आहेत. त्यानंतर आता विद्यापीठानं हे दोन पेपर रद्द केले आहेत. या विद्यापीठातील आरोपी शिक्षक असून त्यांच पेपर फोडण्यात हातभार होता.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल 

उत्तराखंड परीक्षेतील पेपरफुटी घटनेनंतर विद्यापीठाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या देशभर या मुद्यावर आंदोलन सुरु आहे. त्यामुळं हे प्रकरण परत एकदा तापलं आहे. विद्यार्थी पेपरफुटी थांबवण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आहे. आता या धक्कादायक घटनेनं एक धुमाकूळ घातला आहे.

कुलगुरू काय म्हणाले? 

यावेळी या घटनेवर कुलगुरूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, संबंधित शिक्षक ज्या विद्यालयाशी संबंधित आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आमच्या विद्यापीठानं पुढील सात वर्षांसाठी त्या शिक्षकाला कोणत्याही परीक्षा सहभागी होण्यास बंदी घातली आहे. या शिक्षकाला भविष्यात कोणत्याही परीक्षा सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे.