सार
लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग शनिवारी जाहीर करणार आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू केली जाणार आहे.
भारतीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भातील माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली आहे. शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग माहिती देणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकांच्या आणि विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता जारी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाची टीम जम्मू काश्मीरला जाऊन आली. निवडणूक आयोगाने या केंद्र शासित प्रदेशात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. जम्मू काश्मीर याआधी राज्य होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले. यासह, ते राज्यातून केंद्रशासित प्रदेशात बदलण्यात आले.
2019 मध्ये 7 टप्प्यात निवडणुका झाल्या
2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात आणि 19 मे रोजी सातव्या टप्प्याचे मतदान झाले. लोकसभेच्या 543 जागांवर निवडणूक होत आहे. 2019 मध्ये भाजपला 303, काँग्रेस 52, द्रमुक 24, AITC 22, YSRCP 22, SHS 18, JDU 16, BJD 12, BSP 10, TRS 9, LJP 6, NCP 5, SP 5, IND 4, IMCP 3 उमेदवार जिंकले होते तसेच इतर 32 जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या.
आणखी वाचा -
Mamata Banarjee : डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल, टीएमसी पक्षाने मुख्यमंत्र्यांना गंभीर दुखापत झाल्याची दिली माहिती
Jal Jeevan Mission - नळाचे पाणी देशातील 75% घरांपर्यंत पोहोचले, महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घ्यावा लागणार नाही