मिसाईल राणी : शीना राणी यांनी अग्नी 5 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी केले प्रयत्न, घ्या माहिती जाणून

| Published : Mar 13 2024, 01:55 PM IST / Updated: Mar 13 2024, 01:58 PM IST

Agni-5

सार

सॅटेलाईट तज्ज्ञ आर शीना राणी यांनी डीआरडीओ टीमचे नेतृत्व केले असून भारताच्या अग्नी 5 या सॅटेलाईटच्या पहिल्या चाचणी विभागाच्या वेळेस त्यांचा सहभाग होता.

सॅटेलाईट तज्ज्ञ आर शीना राणी यांनी डीआरडीओ टीमचे नेतृत्व केले असून भारताच्या अग्नी 5 या सॅटेलाईटच्या पहिल्या चाचणी विभागाच्या वेळेस त्यांचा सहभाग होता. या उड्डाणाचे सोमवारी प्रक्षेपण ओडिशाच्या किनारपट्टीवरून करण्यात आले.

डीआरडीओचे कार्यक्रम संचालक म्हणून 57 वर्षीय आर शीना राणी यांनी नेतृत्व केले होते. या यशस्वी उड्डाणामुळे भारताचे स्थान जगात मानाने उंचावले आहे. 5000 किलोमीटरच्या पल्यात शेजारील सर्व राष्ट्रांवर भारताला नियंत्रण ठेवता येणार आहे. त्यांनी डीआरडीओमध्ये असताना अनेक नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानावर काम केले आहे.

इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये आठ वर्ष राणी यांनी काम केले. त्यांनी 1999 मध्ये डीआरडीओ जॉईन केले होते. तेव्हापासून त्या अग्नी या सॅटेलाईटवर काम करत आहेत. त्यांनी मन आणि आत्मा लावून सॅटेलाईटचे प्रक्षेपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचा भाग असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा - 
पंतप्रधान मोदींनी जगाला एका दिवसात दिले 2 मोठे संदेश, विकसित भारताचा दिला संदेश
Bank Recruitment 2024: 146 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज करा, नोकरीची ही संधी गमावू नका
नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, पाच मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ